बंद
    • जिल्हा परिषद रत्नागिरी संकेतस्थळ
    • ZIlla Parishad Ratnagiri Flagship 1 MW Solar Project
    • Tourist Bus Project by Women Self Help Groups in Ratnagiri District
    • रत्नागिरी समुद्र किनारा दृश्य

    परिचय

    रत्नागिरी, निसर्गाचे अपार वैभव आणि इतिहासाच्या सुवर्णपानांनी नटलेले कोकणपट्टीचे मनोहारी रत्न आहे. हिरव्या डोंगररांगा, शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे आणि निळ्याशार अरबी समुद्राच्या साक्षीने उभा असलेला हा जिल्हा, जणू निसर्गाने स्वतःच्या कुंचल्यातून रेखाटलेली एक अप्रतिम कलाकृती आहे.
    रत्नागिरीच्या भूमीत सृष्टीचे सौंदर्य जणू मुक्तहस्ताने उधळले आहे. डोंगरांच्या कुशीतून खळाळत वाहणारे निर्झर, गंधाळ हवेने गूज करणारी हिरवीगार झाडे, आणि सूर्यास्ताच्या सोनेरी छटांनी रंगलेले सागरकिनारे हे सर्व दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. येथे अरबी समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर जणू एखादी तालमय गाण्याची मैफल भरवली आहे.
    इतिहासाच्या गाथांनी रत्नागिरीच्या मातीला अधिकच पवित्र केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले, स्वा. वि. दा सावरकरांसारख्या क्रांतिकारकांचा परिसस्पर्श, दानशूर भागोजीशेठ किर यांच्यासारखे पुण्यात्मे आणि थिबा राजवाड्याची भव्यता या भूमीच्या वैभवात भर घालतात.

    अधिक वाचा …

    प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही

    सीईओ झेडपी रत्नागिरी
    माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार, (भा.प्र.से.)