- गट विकास अधिकारी : श्री. गणेश कोंडीराम मंडलिक
- संपर्क क्रमांक : ९९७५९८०१६७
- सहाय्यक गट विकास अधिकारी : श्री. दिलीप सदानंद मर्चंडे
- संपर्क क्रमांक : ९२०९४०७८५२
- पत्ता : पंचायत समिती दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी पिन – ४१५७१२
पंचायत समिती दापोली

चंडिका मंदिर, दाभोळ : दाभोळ मुख्य रस्त्यापासून आत १ कि.मी. आणि दाभोळ बंदरापासून सुमारे ३-४ कि.मी. असलेल्या पठारावर ‘चंडिकादेवी मंदिर’ हे स्वयंभू स्थान आहे. अखंड काळ्या कभिन्न दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवीची सुमारे ३|| फूट उंचीची काळ्या पाषाणातील शेंदूर लावलेली मूर्ती आहे. शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकल्यानंतर अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व आडीवरे भागावर स्वारी केली. तेव्हा मोहिमेदरम्यान अनेक वेळा त्यांनी या स्थानास भेट दिली होती, असा इतिहास सापडतो..
पूज्य साने गुरुजी स्मृती भवन, पालगड : साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. कोर्टाचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.

कड्यावरचा गणपती, आंजर्ले : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सुवर्णदुर्ग नावाचा एक ऐतिहासिक किल्ला आहे जो जोग नदीच्या मुखाशी आहे. किल्ल्याजवळच आंजर्ले बंदर आहे ज्याला दापोलीपासून २० किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य गावाच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. त्याच गावात कड्यावरचा गणपती नावाचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर कोकणातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. एकेकाळी पोहोचणे अत्यंत कठीण असलेले हे ठिकाण आता नैसर्गिक विविधतेने सजवलेल्या रस्त्याने सहज पोहोचता येते.